महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज
हवेली – पूर्व हवेली मध्ये सध्या गॅस सिलेंडर चा मोठा काळाबाजार जोरदार सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. ऐन सना सुदीच्या तोंडावर या गॅस सिलेंडर चा काळाबाजार जोरात सुरु असून या कडे प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचे दिसत आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, पूर्व हवेली मध्ये सिलेंडर कंपनी कडून नेमून दिलेल्या डिलरशिप कडून सिलेंडर चा पुरवठा नागरिकांना पूर्णपणे होत नसून या मध्ये ठराविक ठिकाणी डिलरशिप मार्फत एक ‘एजेंट’ नेमून त्या एजेंट ला सिलेंडर चा अवैध्य रित्या ठराविक पुरवठा केला जातो व त्या नंतर त्या ‘एजेंट’ मार्फत नागरिकांना घरगुती सिलेंडर 1200 रुपये या दराने विक्री केला जातो. हाच 1200 रुपये विक्री केला गेलेला सिलेंडर डिलरशिप मार्फत 880 रूपये या दराने या एजेंट ला दिला जातो, या संपूर्ण घटनेचे व्हिडिओ पुरावे महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज च्या हाती लागले आहेत.
अवैध साठा आणि विक्री
अनेक ठिकाणी घरगुती गॅस सिलिंडरचा साठा करून त्यांची अवैधरित्या विक्री केली जाते. यामुळे भविष्यात मोठ्या दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
घरपोच सिलेंडर ची विक्री नक्की कितीला..?
नागरिकांना वाड्या वस्त्यावर सिलेंडर घरपोच पुरवला जातो या घरपोच सिलेंडर चा नक्की दर किती ? हाच मोठा प्रश्न नागरिकांना पडला असून, सूत्रांच्या माहितीनुसार 880 रुपये किंमतीला घरपोच सिलेंडर ची विक्री केली जाते.
सिलेंडर डिलरशिप एजन्सी मध्ये नागरिक सिलेंडर आणण्यास गेले असता, त्यांना सिलेंडर संपले असे सांगण्यात येते, मग नागरिकांना नाईलाजास्तव या च डिलरशिप ने ठेवलेल्या एजेंट कडून 1200 रुपये किमतीने सिलेंडर विक्री केला जातो. या अशा पद्धतीने सिलेंडर चा सुरु असलेल्या मोठ्या काळ्या बाजाराला प्रशासन काय कारवाई करणार ? या कडे आता नागरिकांचे लक्ष वेधून आहे.

✍🏻मुख्य संपादक – हनुमंत सुरवसे