महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज
लोणी काळभोर : संपूर्ण महाराष्ट्र भर सध्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि पुढे येणाऱ्या ग्रामपंचायत निवडणूकी ची रणधुमाळी जोरात सुरु आहे.
निवडणूका डोळ्यापुढे ठेऊन स्वयंघोषित भावी उमेदवार ऐन दिवाळीच्या मुहूर्तावर मिठाई च्या बॉक्स मधून मतदारांना दिशाभूल करताना पाहायला मिळत आहे.
मतदारांनो आपले मौल्यवान मत हे खूप महत्वाचे असून जनतेसाठी सदैव तत्पर निस्वार्थी पणे राजकारण नव्हे तर समाजकारण करणाऱ्या उमेदवारालाच आपले मत द्या एका मिठाई च्या बॉक्स बळी पडू नका, मिठाई देऊन हे मत विकत घेता येत नाही किंव्हा मतदारांची दिशाभूल करता येत नाही असे मत शिवसेना (शिंदे गट) पुणे जिल्हा संघटक निलेश काळभोर यांनी व्यक्त केले आहे.
मतदार हे भिकारी नाहीत आपल्या मिठाई च्या बॉक्स वर मतदारांची दिवाळी साजरी होत नसते, मतदारांनो लाचार होऊ नका, स्वाभिमानाने मतदान करा आणि योग्य त्या उमेदवारालाच आपली सेवा करण्याची संधी द्या असेही निलेश काळभोर यांनी बोलताना सांगितले.

✍🏻मुख्य संपादक – हनुमंत सुरवसे