शिवसेना जिल्हा संघटक निलेश काळभोर यांच्या संपर्क कार्यालयाचे भव्य उद्घाटन
महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज
लोणी काळभोर (ता. हवेली) : शिवसेना पक्षाचे पुणे जिल्हा संघटक निलेश काळभोर यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन दिनांक ३ सप्टेंबर २०२५ रोजी मोठ्या उत्साहात पार पडले. या कार्यालयाचे उद्घाटन माननीय राम रेपाळे राज्य सचिव महाराष्ट्र राज्य शिवसेना यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी शिवसेना पुणे शहर महानगर प्रमुख माननीय रवींद्र धंगेकर,यांच्यासह विविध मान्यवरांची उपस्थिती लाभली.
उद्घाटन प्रसंगी बोलताना माननीय राम रेपाळे म्हणाले, “निलेश माझा लाडका कार्यकर्ता आहे. तो माझ्याशी भांडतो, पण ते भांडण स्वतःसाठी नसून समाजासाठी असते. त्यामुळे मी त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे.” तसेच त्यांनी सांगितले की, बाळासाहेब ठाकरे यांच्या “७० टक्के समाजकारण आणि ३० टक्के राजकारण” या संकल्पनेवर उभी राहिलेली शिवसेना आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सामान्यांच्या प्रश्नांना खरी दिशा देत आहे.
माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी भाषणात सांगितले की, “संपर्क कार्यालय हे मंदिर आहे आणि येथे येणारे नागरिक हे दैवत आहेत. त्यांच्या समस्या मार्गी लावणे हीच खरी सेवा आहे.”
माननीय नाना भानगिरे यांनी ग्वाही दिली की, “निलेश भाऊंना भविष्यात मोठी संधी मिळेल. त्यांनी सर्वसामान्यांचा आवाज बुलंद करून त्यांचे प्रश्न सोडवावेत. पक्ष त्यांच्या खंबीर पाठीशी उभा आहे.”
भारतीय जनता पक्षाचे माननीय प्रवीण काळभोर यांनी निलेश दादांच्या कार्याचे कौतुक करताना सांगितले, “सर्वसामान्य घरातून आलेले निलेश दादा आज जनतेचा आवाज बनले आहेत. त्यांच्या पाठीशी तरुणाई व महिला वर्गाचा मोठा पाठिंबा आहे. त्यामुळे भविष्यात ते नक्कीच चांगले कार्य करतील.”
या कार्यक्रमाला मान्यवरांची मोठी उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अलंकार कांचन यांनी केले तर सूत्रसंचालन शाहीर महेश खुळपे यांनी केले. मोठ्या संख्येने युवक, नागरिक आणि महिला भगिनींच्या उपस्थितीने कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

✍🏻मुख्य संपादक – हनुमंत सुरवसे